ZEE Natya Gaurav Puraskar 2024: सिद्धार्थचा भावनिक परफॉर्मन्स, 'या' नाटकाने मारली बाजी

ZEE Natya Gaurav Puraskar 2024
ZEE Natya Gaurav Puraskar 2024sakal

मराठी नाट्यीश्वातील मानाचा पुरस्कार झी नाट्यगौरव २०२४ थाटात पार पडला. या सोहळ्याला कलाविश्वातील सगळ्या मान्यवरांनी हजेरी लावली. प्रशांत दामले, मोहन जोशी, वंदना गुप्ते, संजय मोने, कविता मेढेकर, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, प्रिया बापट, वैभव मांगले, अतुल परचुरे, पल्लवी अजय अशा अनेकांनी हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली. (Rashant Damle, Mohan Joshi, Vandana Gupte, Sanjay Mone, Kavita Medhekar, Umesh Kamat, Siddharth Jadhav, Priya Bapat, Vaibhav Mangle, Atul Parchure, Pallavi Ajay)

ZEE Natya Gaurav Puraskar 2024
Zee Chitra Gaurav 2023: कुणाला मिळणार 'झी चित्र गौरव' २०२३ पुरस्कार.. नामांकन यादी जाहीर..

या कार्यक्रमाला कलाकारांनी वेगवेगळे परफॉर्मन्स सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. रंगमंचावर कलाकारांनी वेगवेगळ्या नाटकातील छोटे अंक सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली. सिद्धार्थ जाधवने सादर केलेल्या परफॉर्मन्सने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं तर प्रिया आणि उमेशच्या रोमँटिक परफॉर्मन्सने सगळ्यांची मनं जिंकली. तर अतुल परचुरेंच्या परफॉर्मन्सने सगळ्यांची वाहवा मिळवली.(Atul Parchuren's performance won everyone's admiration.)

यावेळी अनेक नाटकांना पुरस्कार मिळाले. तर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर प्रिया-उमेशच्या 'जर-तरची गोष्ट' या नाटकाने बहुतेक पुरस्कार मिळवले.(Veteran actor Mohan Joshi was honored with the Lifetime Achievement Award)

पाहूया झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा विजेत्यांची यादी:

१. सर्वोत्कृष्ट रंगभूषा – रितुपर्णा किर्तोनिया (प्रायोगिक नाटक-काक्षी)

२. सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सई कदम, निशांत शिंदे (प्रायोगिक नाटक-रुक्मिणी)

३. सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – प्रणव सपकाळे (प्रायोगिक नाटक -कलगीतुरा)

४. सर्वोत्कृष्ट नेपथ्य – राहुल ढेंगळे, साहिल सावंत (प्रायोगिक नाटक -खुदीराम)

५. सर्वोत्कृष्ट रंगभूषा – कमलेश बिचे – चाणक्य (व्यावसायिक नाटक )

६. सर्वोत्कृष्ट वेशभूषा – नीरजा पटवर्धन – चाणक्य (व्यावसायिक नाटक )

७. सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – अमोघ फडके – जन्मवारी (व्यावसायिक नाटक )

८. सर्वोत्कृष्ट नेपथ्य -संदेश बेंद्रे – २१७ पद्मिनी धाम (व्यावसायिक नाटक )

९. सर्वोत्कृष्ट संगीत – ऋषिकेश शेलार (प्रायोगिक नाटक-कलगीतुरा)

१०. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – निरंजन पेडगावकर (प्रायोगिक नाटक- पाच फुटाचा बच्चन )

११. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – निनाद म्हैसाळकर – चाणक्य (व्यावसायिक नाटक )

१२. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अनुष्का बोऱ्हाडे (प्रायोगिक नाटक – मॅड सखाराम)

ZEE Natya Gaurav Puraskar 2024
Sakal Sanman Puraskar : रमेश खरमाळे यांना सकाळ सन्मान पुरस्कार जाहीर

१३. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सोमनाथ लिंबस्कर (प्रायोगिक नाटक – अण्णांच्या शेवटच्या इच्छा)

१४. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी अजय – जर तरची गोष्ट (व्यावसायिक नाटक )

१५. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – आशुतोष गोखले – जर तरची गोष्ट (व्यावसायिक नाटक )

१६. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – अनिता दाते – माझ्या बायकोचा नवरा (व्यावसायिक नाटक )

१७. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – वैभव मांगले-मर्डरवाले कुलकर्णी (व्यावसायिक नाटक )

१८. सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक – मर्डरवाले कुलकर्णी

१९. सर्वोत्कृष्ट लेखन – दत्ता पाटील (प्रायोगिक नाटक) – कलगीतुरा

२०. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – मोहित टाकळकर (प्रायोगिक नाटक) – घंटा घंटा घंटा घंटा

२१. सर्वोत्कृष्ट लेखन – चिन्मय मांडलेकर – गालिब (व्यावसायिक नाटक )

२२. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – अद्वैत दादरकर, रणजित पाटील – जर तरची गोष्ट (व्यावसायिक नाटक)

ZEE Natya Gaurav Puraskar 2024
Raj Thackeray यांनी Maharashtra Bhushan Puraskar वरून Eknath Shinde, Fadnavis यांना खडसावलं

२३. नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर- अमृता पवार

२४. सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी : प्रिया बापट , उमेश कामत

२५. जीवनगौरव पुरस्कार २०२४ – मोहन जोशी

२६. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मल्लिका सिंग हंसपाल (प्रायोगिक नाटक) – घंटा घंटा घंटा घंटा

२७. सर्वोत्कृष्ट अभिनेता – ललित प्रभाकर (प्रायोगिक नाटक) – घंटा घंटा घंटा घंटा

२८. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अमृता देशमुख – नियम व अटी लागू (व्यावसायिक नाटक )

२९. सर्वोत्कृष्ट बालनाट्य – चेरी एके चेरी

३०. विशेष लक्षवेधी प्रायोगिक नाटक – कलगीतुरा

३१. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक – घंटा घंटा घंटा घंटा

३२. विशेष प्रबळ व्यक्तिमत्व : अनिता दाते

३३. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक – जर तरची गोष्ट

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कलाकारांचं अभिनंदन केलं.

ZEE Natya Gaurav Puraskar 2024
Sakal Sanman Puraskar 2024: आयुष्मानचा 'स्टार ऑफ द डेकेड' पुरस्कारानं गौरव; पोस्ट शेअर करत म्हणाला, "मी आभारी आहे!"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com