
भारतातील सर्वांत प्रतिष्ठित आणि आवडत्या मीडिया ब्रँड्सपैकी एक असलेल्या झी ने २०.८ करोड घरांमधील ८५.४ करोड प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आपली नवीन ब्रँड ओळख आणि शक्तिशाली ब्रँड वचन “युअर्स ट्रुली झी” सह एका धाडसी नव्या युगात प्रवेश केला आहे. या गतीला पुढे चालना देण्यासाठी आणि या वैविध्यपूर्ण उद्योगामध्ये आपली भूमिका अधिक ठामपणे मांडण्यासाठी झीने एक महत्त्वपूर्ण उद्योगाभिमुख उपक्रम ‘झी व्हॉट्स नेक्स्ट’ सुरू केला आहे. झीने दोन नव्या वाहिन्या सुरू केल्या आहेत. झी बांगलासोनार आणि झी पावर. कंटेंट आणि तंत्रज्ञान यांचा मिलाफ असलेला पॉवरहाऊस ब्रँड म्हणून होत असलेल्या नेटवर्कच्या रूपांतराचा वेध घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.