

1980s AI Trend
esakal
प्रियदर्शन
ऐंशीच्या दशकात जाण्याचा ट्रेन्ड आलाय. एका छायाचित्रात त्या काळातील कपडे दिसू शकतात, चेहरा दिसू शकतो, केसांची शैली दिसू शकते; पण त्या छायाचित्राच्या चौकटीबाहेरचा काळ दिसत नाही. त्याचबरोबर त्या काळाची निवडदेखील एका विशिष्ट सांस्कृतिक दृष्टिकोनातून केली जात आहे. त्यात त्या काळातील आर्थिक संकटे दिसत नाहीत, राजकीय संघर्ष दिसत नाहीत, समाजातील तणाव दिसत नाहीत, हिंसेच्या जखमा दिसत नाहीत आणि त्याचबरोबर त्या काळातील आशा, स्वप्ने आणि बदलाची धडपडही पूर्णपणे दिसत नाही. म्हणूनच भूतकाळाची खरी आठवण म्हणजे त्याचे केवळ सुंदर चित्र तयार करणे नव्हे. त्यातील सुख-दुःख, जखमा आणि जश्न हे सर्व एकत्र स्वीकारणे होय.
जगभरात गेल्या काही दिवसांपासून ऐंशीच्या दशकात परत जाण्याची जणू एक स्पर्धाच सुरू झाली आहे. एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रोत्साहनामुळे किंवा एखाद्या एआय टूलच्या आवाहनामुळे लोक आपली त्या काळातील प्रतिमा पाहण्यात आणि इतरांना दाखवण्यात गुंतले आहेत. आपण त्या काळात कसे दिसत असू किंवा त्या काळात आपले अस्तित्व असते तर आपण कसे दिसलो असतो, हे पाहण्याची एक उत्सुकता निर्माण झाली आहे. एआय टूल्सही लोकांच्या सध्याच्या छायाचित्रांना ऐंशीच्या दशकातील कपडे, केशभूषा आणि वातावरण देऊन त्यांना त्या काळातील व्यक्तींमध्ये रूपांतरित करत आहेत.