
दोन हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्या आहेत, असं आपण अनेकदा म्हणतो. मात्र, “या नोटा कायदेशीररीत्या बंद करण्यात आलेल्या नसून फक्त चलनातून बाहेर काढण्यात आल्या आहेत,” असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं आहे. ‘नोटा कायदेशीररीत्या बंद होणे’ आणि ‘चलनातून बाहेर जाणे’ यामधील फरक नेमका काय आहे? दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्याची गरज का भासली? भारताच्या नोटाबंदीच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना कोणत्या आहेत? हे सर्व जाणून घेऊया सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.