Premium|Lata Mangeshkar: एक आवाज थांबला… पण गूंज अजून मनात रेंगाळते. त्या शेवटच्या क्षणांची हृदयस्पर्शी कहाणी.

Mangeshkar Family: शेवटच्या प्रवासाच्या काळात नातेवाईक न आल्याने वाटणारी एकाकी भावना आणि लता दीदींची समजूतदारता लेखात प्रकर्षाने दिसते. मीराबाईसारखी भावना व्यक्त करणाऱ्या दीदींच्या नजरेतून संपूर्ण घटनाक्रम पाहायला मिळतो
Lata Mangeshkar
Lata Mangeshkaresakal
Updated on

हृदयनाथ मंगेशकर

kunteshreeram@gmail.com

‘‘लता! ए लता!!! ’’

श्री पाद जोशी घराखालून दीदीला हाका मारीत होता. दीदी त्या वातावरणातून स्वतःला सावरत कशीबशी बाहेर आली. आणि ‘‘ थांब मीच

खाली येते ’’ असे म्हणून ती खाली जायला निघाली, तोच श्रीपाद जोशीच वर चढून आला. घामाने डबडबलेला, हताश, उजाड, रडव्या सुरात तो म्हणाला. ‘‘ लता हॅास्पिटल मधून मालकांना आणले आहे आणि ऽऽऽ’’ दीदीने त्याला थांबवत अति आतुरतेने विचारले, ‘‘म्हणजे बाबा बरे आहेत.

इतक्या लवकर सोडले, म्हणजे बाबा ठीक आहेत. सकाळपासून मी देव पाण्यात ठेवले आहेत, मंगेशाने वाचवले त्यांना, चल त्यांना वर घेऊन येऊ या.’’ दीदी एका श्वासात बडबडत होती, बाबा सकाळी आजारी झाले आणि त्यांना हॅास्पिटलमध्ये नेले, तेव्हापासून दीदी स्वःतशी बडबडत होती, ‘‘लाई हयात आये कजा ले चली चले अपनी खुशी न आये न अपनी खुशी चले’’. या जगात ‘जन्म’ घेऊन आला आणि ‘मृत्यू’ घेऊन निघालाय, मी आपल्या मर्जीने आनंदाने आलो नव्हतो. आणि ना आपल्या मर्जीने आनंदाने निघायलोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com