

प्रा. अविनाश कोल्हे
nashkohl@gmail.com
मॅक्झिम गॉर्कीच्या रशियन नाटकाचा हिंदी अवतार म्हणजे ‘रैन बसेरा’... त्यात प्रेक्षकांना सहन होत नाही, असं दाहक वास्तव आहे. सर्व पात्रं महानगरीय अधोलोकात वावरणारी आहेत. आपल्या स्वप्नांबद्दल ती बोलतात. शेवटी कोणाचीही स्वप्नं प्रत्यक्षात येत नाहीत...
गतिक पातळीवर नाव मिळवलेल्या लेखकांच्या साहित्यकृतींवर आधारित नाटकं किंवा त्यांनी स्वतः लिहिलेली नाट्यं बघण्याचा आनंद वेगळा असतो. अलीकडे मुंबईत रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की या गाजलेल्या (मराठी वाचकांना चांगल्यापैकी माहीत असलेल्या) कादंबरीकार, कथाकाराचं दोन अंकी नाटक The Lower Depths बघायला मिळालं.