Premium| Raja Ravi Varma : राजा रविवर्मांच्या वारशाची जपणूक करणारे किलीमनूर!

Kilimanoor palace : चित्रकार राजा रविवर्मांच्या जन्मगाव किलीमनूरला दिलेल्या भेटीत लेखिकेला अनपेक्षितपणे राजेशाही पाहुणचाराचा अनुभव आला. त्यांच्या नातू राजा रामवर्मा यांच्याशी झालेल्या संवादातून कलेचा आणि इतिहासाचा भावनिक प्रवास उलगडतो
Art in Kilimanoor palace

Art in Kilimanoor palace

esakal

Updated on

मनस्विनी प्रभुणे-नायक

राजा रविवर्मा यांचं घर बघायचं आणि परत निघायचं, असं ठरवून गेले होते; पण दोन तासांचा राजेशाही पाहुणचार घेऊन परतले. माझ्या तोडक्यामोडक्या इंग्रजीमध्ये सलग दोन तास राजा रामवर्मा यांच्याशी मारलेल्या गप्पा मला आजही अचंबित करतात.

‘किलीमनूर’ हे राजा रविवर्मा यांचं जन्मगाव. तिरुअनंतपुरमला एका सेमिनारच्या निमित्ताने गेले होते, तेव्हा या गावी जाण्याबद्दल नियोजन नव्हतं. सेमिनार संपल्यावर तिरुअनंतपुरममध्येच दोन दिवस मुक्काम करायचा, एवढंच पक्कं होतं. सेमिनार संपताच मी तिरुअनंतपुरममध्ये एकटी भटकत राहिले. नेपिअर संग्रहालयात येऊन बसले. इथे राजा रविवर्मा यांच्या मूळ चित्रांचे संग्रहालय आहे. दुसऱ्या दिवशी १२ फेब्रुवारीला माझ्या भावाचा मुकेशचा वाढदिवस होता. तो गेल्यानंतरचा, त्याच्याशिवायचा हा पहिलाच वाढदिवस. अभिनव महाविद्यालयात शिकत असताना मुकेशने राजा रविवर्मा यांच्या मळवली (लोणावळा) येथील प्रिंटिंग प्रेस - त्यांच्या ‘ओलिओग्राफ- लिथोग्राफ प्रिंटिंग’ कलेवर संशोधन केलं होतं. तिरुअनंतपुरमच्या मुक्कामात तिथल्या राजवाड्यांमध्ये फिरताना सतत राजा रविवर्मा यांचे संदर्भ समोर येत होते. याच ‘त्रावणकोर’ राजघराण्याचा तेदेखील एक भाग होते. त्यामुळे इथं राजा रविवर्मा यांच्या भूमीत असताना मुकेशच्या आठवणीने मी भावनिक झाले होते. डोळ्यांत सारखी असावं येत होती. इथवर आलेच आहे, तर राजा रविवर्मा यांच्या गावी जाऊन येऊ या, असं वाटून मी किलीमनूरला निघाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com