
कल्याणी शंकर
पंजाब आणि गुजरातमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयाने आम आदमी पक्षामध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षामध्ये निर्माण झालेले नैराश्य या निमित्ताने झटकले जाणार आहे, असे मानले जाते. त्यातून वेगवेगळ्या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला यश मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
गुजरात आणि पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने (आप) विजय मिळविला. त्यामुळे, दिल्लीतील पराभवानंतर नैराश्य आलेल्या या पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.