
सुरेंद्र पाटसकर
दिल्लीतील पराभव आम आदमी पक्षाच्या (‘आप’) जिव्हारी लागला आहे. पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. त्यामुळे ‘आप’ने आता पंजाबकडे लक्ष केंद्रित केले आहे. जणू काही आता त्यांची अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे.
आम आदमी पक्षाच्या (‘आप’) पंजाबमधील सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या एकमेव राज्यात आता ‘आप’ची सत्ता आहे. दिल्लीतील पराभवानंतर पंजाबवर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. येथील कामगिरीवरच आता त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.