Premium|Albert Mehrabian 7-38-55 rule : ‘इशारों इशारों’मधल्या संवादाचे वास्तव...

Non-verbal Communicationc : मानवी संवादात शब्दांपेक्षा देहबोलीचे स्थान अत्यंत प्रभावी असून, ७-३८-५५ नियमानुसार भावना व्यक्त करताना शरीरच मुख्य माध्यम ठरते. संज्ञापन ही केवळ माहितीची देवाणघेवाण नसून, तो सदेह आविष्काराचा एक जिवंत आणि सखोल अनुभव असतो.
Albert Mehrabian 7-38-55 rule

Albert Mehrabian 7-38-55 rule

esakal

Updated on

भाषिक प्रभुत्व येईपर्यंत लहान मुलांचा संवाद मुख्यत्वे शरीराच्या माध्यमातूनच चाललेला असतो. त्या अर्थाने पाहिले तर संवाद किंवा संज्ञापन हे फक्त माहितीची देवाण-घेवाण नसते. तो दोन्ही बाजूंसाठी सदेह आविष्काराचा अनुभव असतो.

काश्मीर की कली (१९६४) या चित्रपटातील ‘इशारों इशारों मे दिल लेने वाले’ हे प्रसिद्ध गाणे तुम्ही ऐकलं असेलच. त्यात ती त्याला लडिवाळपणे प्रश्न विचारते, “केवळ इशाऱ्यांमधून माझे मन जिंकण्याचे हुनर तू कुठे शिकलास?” त्यावर तोही खट्याळपणे उत्तर देतो, “नजरेच्या खेळांची जादू तू जिथे शिकली तिथेच.” इशारे, नजर, मौन, लज्जा यांसारख्या निःशब्द अभिव्यक्तीची प्रेमामधील महती सांगणारे हे काही एकमेव गाणे नाही. हिंदी, मराठी आणि अन्य भाषांमध्येही अशी गाणी शेकड्याने सापडतील. अशा असंख्य गाण्यांच्या आधारे बघायला गेलो तर लक्षात येते की, प्रेम व्यक्त करणे आणि प्रेम जाणवणे या दोन प्रांतांमध्ये शब्दांचे स्थान तसे दुय्यमच. तिथे खरी मातबरी नजरेची, स्पर्शाची, शारीर सोबतीची. जे काही खोलवर सांगितले जाते, समजते, विश्वासार्ह वाटते ते जाणवते संपूर्ण शारीर संवेदनांच्या पातळीवर. ते फक्त शब्दार्थांपुरते मर्यादित नसते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com