Premium|CWTS Leiden Ranking 2026 : संशोधकीय गुणवत्तेचे ‘चलन’

Global University Rankings and Research Quality : २०२६ च्या 'लेडेन' जागतिक क्रमवारीत चीनने अमेरिकेला मागे टाकले असून पहिल्या दहामध्ये आठ चिनी विद्यापीठांनी स्थान पटकावले आहे. भारताची ७७ विद्यापीठे या यादीत असली तरी, संशोधनावरील अल्प खर्च आणि गुणवत्तेच्या निकषांमुळे जागतिक स्तरावर भारत अजूनही बराच मागे असल्याचे दिसून येते.
Global University Rankings and Research Quality

Global University Rankings and Research Quality

esakal

Updated on

विज्ञानाचे अभ्यासक - शहाजी मोरे

नेदरलॅंडच्या लेडेन विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टडीज’ने जगभरातील १५९४ विद्यापीठातील संशोधकांनी लिहिलेले शोधनिबंध व त्यांना किती वेळा इतर संशोधकांनी उद्धृत (साईट) केले व संशोधनाच्या दर्जाच्या मूल्यमापनाच्या इतर निकषांवर आधारित क्रमवारी जानेवारी महिन्यात जाहीर केली आहे.

आश्चर्य म्हणजे शैक्षणिक, संशोधन गुणवत्तेचा जागतिक मानदंड समजले जात असलेले अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठ या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी गेले आहे. आजपर्यंत हे विद्यापीठ अव्वल स्थानीच असते वा आहे व अमेरिकेतील इतर सात-आठ विद्यापीठे पहिल्या दहामध्ये येत असत. ‘लेडेन’च्या २०२६च्या क्रमवारीत पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये आठ विद्यापीठे चीनमधील आहेत. चीनमधील झेजियांग विद्यापीठाने या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले आहे. लेडन विद्यापीठ १७१व्या स्थानी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com