

The Last Jew in Vinnitsa
esakal
गेली ८४ वर्षं ‘द लास्ट ज्यू इन विन्नित्सा’ हे छायाचित्र जगाला अस्वस्थ करीत असले, तरी त्यातील मारेकऱ्याची ओळख मात्र गुलदस्त्यात होती. आज २०२५ मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने हे कोडं उलगडलं आहे. समोर आलेलं सत्य थक्क करणारं आहे. तो थंड डोक्याचा मारेकरी कोणी जन्मजात गुन्हेगार नव्हता, तर मुलांवर संस्कार करणारा एक सुशिक्षित शाळेचा शिक्षक होता - जेकोबस ओनेन.
खड्ड्याच्या काठावर मृत्यूला सामोरे जाणारा एक हतबल माणूस आणि त्याच्या मागे पिस्तूल रोखून उभा असलेला एक निर्विकार जर्मन सैनिक. त्या सैनिकाच्या चेहऱ्यावर ना राग होता, ना द्वेष; जणू तो एखादं नेहमीचं काम करीत होता.