भूषण महाजन
पहेलगाम घटनेचे पडसाद कसे उमटतात ह्याचे निरीक्षण करावे लागेल. नक्की काय परिणाम होतील, त्याचे गांभीर्य किती असेल ह्याचा अभ्यास करूनच बाजार आपली पुढची चाल ठरवेल. ह्या तेजीच्या धावत्या गाडीत ज्यांना चढता आले नाही, त्यांना आणखी एक संधी मिळाली असे कदाचित म्हणता येईल.
शेअर बाजारात आणि प्रेमात अनेक बाबतींत साम्य आहे. कुठे कधी काय अडचणी येतील काही सांगता येत नाही. म्हणूनच अवचित ओठांवर जिगर मुरादाबादीचा हा प्रसिद्ध शेर येतो :
ये इश्क़ नहीं आसाँ, इतना ही समझ लीजे,
इक आग का दरिया है और डूब के जाना है