
केदार फाळके
editor@esakal.com
अफजलखानाच्या वधाची ज्या-ज्या साधनांमध्ये माहिती मिळते, ती किमान दहा भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये विखुरली आहे. मुहम्मद आदिलशाहाच्या मृत्यूदरम्यान आदिलशाहीत जी अस्थिरता निर्माण झाली होती, ती १६५८च्या शेवटी नाहीशी होऊन शिवाजी महाराजांकडे लक्ष देणे शक्य झाले. अफजलखानाची शिवाजी महाराजांविरुद्ध जी नेमणूक झाली त्याची तारीख-ए अलीमध्ये विस्तृत माहिती मिळते.
‘‘स्वर्गवासी बादशाह (मुहम्मद आदिलशाह) आजारी पडला तेव्हा, लबाडीत व कपटविद्येत दुष्ट सैतनाचा गुरू असलेल्या बहिष्कृत काफिर सीवा भोसले याने तळकोकणचा संपूर्ण मुलूख लुटीच्या झाडूने साफ करून त्या मुलखातील राहीरचा (रायगड) किल्ला काबीज केला. स्वर्गवासी बादशाह निधन पावला तेव्हा ती बातमी त्या दुष्ट काफिराने विजयवार्तेपेक्षा आनंददायी मानून त्या मुलूखातील (आणखी) किल्ले हस्तगत केले.