

JNU protest slogans
esakal
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात ज्या प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या, त्या दिल्या गेल्या नसत्या तर बरे झाले असते. ‘मोदी, तेरी कब्र खुदेगी’ ही घोषणा योग्य तर नाहीच पण अत्यंत चुकीची आहे. शिवाय अतिशय आक्रमक घोषणा अनेकदा खऱ्या राजकीय उद्देशांना किंवा लोकशाही असहमतीच्या धारेला बोथट करतात. मात्र भारतीय राजकारणात अशा अलोकशाही आणि आक्रमक घोषणांचा एक संपूर्ण इतिहास आहे. एके काळी इंदिरा गांधी आणि व्ही. पी. सिंग यांच्याविरोधातही अशा घोषणा मोठ्या प्रमाणावर दिल्या गेल्या होत्या.
हल्ली एक वाईट बाब अशी झाली आहे, की आपल्या समाजात भाषेची समजही कमी झाली आहे आणि सहनशीलताही कमी झाली आहे. कालपर्यंत जे वाक्प्रचार सर्वसाधारण वाटत होते, ते आता नवे नवे अर्थ धारण करू लागले आहेत. ‘कबर खोदणे’ याच एक अर्थ स्वतःच स्वतःला संकटात टाकणे असाही आहे. मात्र, ज्याचा शब्दशः अर्थ लावण्यात अडचण येते. पण भाजप समर्थकांना हाच शब्दशः अर्थ पाहायचा आहे, कारण त्यामुळे त्यांचे राजकारण अधिक सोयीचे होते; ‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांवर हिंसक होण्याचा किंवा हिंसेचा इरादा बाळगण्याचा त्यांचा आरोप अधिक खरा वाटू लागतो.