Premium|Study Room : ॲग्रीटेक म्हणजे काय? आधुनिक तंत्रज्ञानाने शेती कशी बदलते?

Precision Farming in India : ॲग्रीटेकमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि IoT सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक अचूक, उत्पादक आणि फायदेशीर बनत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत त्याची भूमिका समजून घ्या.
Precision Farming in India

Precision Farming in India

esakal

Updated on

लेखक : श्रीकांत जाधव

शेती हा आजही भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि ग्रामीण जीवनाचा कणा आहे. देशातील जवळपास निम्म्या मनुष्यबळाला शेती आणि त्यासंलग्न व्यवसायांमधून रोजगार आणि उपजीविकेचे साधन मिळते. मात्र, जागतिक स्तरावर आणि भारतातही कृषी क्षेत्रासमोर सध्या अनेक गंभीर संकटे उभी आहेत. हवामान बदलाचा वाढता धोका, जमिनीचा खालावत चाललेला दर्जा आणि वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येची अन्नाची गरज पूर्ण करण्याचे मोठे आव्हान या क्षेत्रासमोर आहे.

ॲग्रीटेक म्हणजे नेमके काय आणि ते पारंपरिक शेती कशी बदलते?

सोप्या भाषेत सांगायचे तर, 'ॲग्रीटेक' म्हणजे शेतीच्या संपूर्ण मूल्यसाखळीमध्ये (Value Chain) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन, रिमोट सेन्सिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि डिजिटल मार्केट्स यांसारख्या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे. याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना अचूक आणि माहितीवर आधारित निर्णय घेण्यास सक्षम करणे हा आहे.

सध्या जागतिक स्तरावर शेतीची उत्पादकता अत्यंत असमान आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये जिथे शेतीचे मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले आहे, तिथे मक्याचे उत्पादन प्रति हेक्टरी १० टनांपेक्षा जास्त असू शकते. हे सर्व अचूक तंत्रज्ञान (Precision Tools) आणि कार्यक्षम निविष्ठांमुळे शक्य होते. याउलट, विकसनशील प्रदेशांमध्ये जिथे शेतीतील एकूण मनुष्यबळापैकी जवळपास ८० टक्के लोक अल्पभूधारक शेतकरी आहेत, तिथे हेक्टरी उत्पादन जेमतेम २ ते ३ टन इतकेच असते. याचे मुख्य कारण म्हणजे मानवी श्रमावर असलेले अवलंबित्व, केवळ पावसावर विसंबून असलेली शेती आणि खते-बियाण्यांची मर्यादित उपलब्धता.

हीच दरी भरून काढण्याचे काम ॲग्रीटेक 'अचूक शेती' (Precision Farming) च्या माध्यमातून करत आहे. याचे प्रत्यक्ष परिणाम खालीलप्रमाणे दिसून येतात :

अ) माहितीवर आधारित निर्णय (Data-Driven Decisions) : स्थानिक हवामानातील बदलांचा रिअल-टाइम मागोवा घेणे, मातीचा पोत आणि आरोग्याची अचूक माहिती मिळवणे आणि पिकांच्या वाढीवर सतत लक्ष ठेवणे आता शक्य झाले आहे.

ब) बाजारपेठेतील मध्यस्थांची साखळी तोडणे : तंत्रज्ञानामुळे शेतकरी थेट ग्राहकांशी किंवा मोठ्या खरेदीदारांशी जोडले जात आहेत. यामुळे अनावश्यक मध्यस्थांची साखळी संपुष्टात येऊन शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव (Price Discovery) मिळण्यास मदत होत आहे.

क) ज्ञानाचे सक्षमीकरण : संस्थात्मक कर्ज, पीक विमा आणि हवामान व पिकांनुसार सानुकूलित कृषी सल्ले आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत.

व्यापक आर्थिक परिणाम : उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ॲग्रीटेक प्लॅटफॉर्म्सच्या पद्धतशीर अवलंबामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २५ ते ३५ टक्क्यांनी वाढ होण्याची क्षमता आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) जसे की 'भूकबळी शून्यावर आणणे' आणि 'गरिबी निर्मूलन' साध्य करण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे इंजिन ठरू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com