
इंग्रजी आक्रमणाचा धोका जाणणाऱ्या एक दूरदृष्टीच्या आणि मुरलेल्या राजकारणी म्हणून अहिल्यादेवी होळकरांचं नाव घेता येईल. आपल्या साम्राज्यात फक्त मंदिरं, घाट, बारव, विहीरी आणि अन्नछत्र उभारूनच अहिल्यादेवी थांबल्या नाहीत. त्यांनी एक आधुनिक पलटण उभी केली पण हे सैन्य आपल्याच राज्याविरुद्ध उलटू नये, यासाठी अहिल्यादेवींनी तितकाच कठोर करारही केला.
इंग्रजी अधिकारी आणले तर ते ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढणार नाहीत, हे लक्षात घेऊन अहिल्यादेवींनी अमेरिकन लष्करी तज्ज्ञ बॉइडला पाचारण केलं. पण त्या पलटणीमध्ये भारतीय लोकांचं प्रमाण कायमच जास्त असेल, अशी अट घातली. आणखीही महत्त्वाच्या अटी, कलमं या करारात होती, ज्यामुळे अहिल्यादेवींच्या हयातीत होळकरांच्या राज्यावर एकदाही बाह्य शत्रूचे आक्रमण झाले नाही.
ही कलमं कोणती, अहिल्यादेवींनी लष्करी आणि राजकीय क्षेत्रात नेमक्या कशाप्रकारे नियोजन, संयोजन केलं होतं. या सगळ्याविषयी वाचा, सकाळ प्लसच्या या खास लेखामध्ये...