AI hack AI
Esakal
experts worldwide debate slowing frontier AI amid rising cyber risks and geopolitical competition...
तुमच्या मते AI चे काम काय आहे..? तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणं, मजकूर लिहिणं किंवा माहिती शोधून देण्याचं काम करणारा ‘चॅटबॉट’ एवढंच ना? पण एआय आता एवढ्यावर थांबलेले नाहीत. आता एआयची वाटचाल त्यापुढेही झाली आहे. स्वतः माहिती शोधणे, कोड लिहिणे, सॉफ्टवेअरमध्ये बदल करणे, इंटरनेटवरून माहिती मिळवणे आणि दिलेले एखादे काम अनेक टप्प्यांत स्वतः पूर्ण करणे अशा ‘एजंटिक एआय’कडे जग वेगाने जात आहे.
नुकत्याच काही घटना अशा घडल्या आहेत ज्याने जग हादरलं आहे. AI ने AI लाच हॅक केलं. हे नेमकं कसं झालं. एआय आता माणसाच्याही हाताबाहेर चाललं आहे का, जगभरातून एआयचा वेग कमी करण्याची मागणी का केली जात आहे, नेमक्या अशा कोणत्या घटनांमुळे ही सगळी प्रश्नचिन्ह उभी राहिली आहेत, त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘AI Force’ स्थापन करण्याची आणि ‘AI Czar’ नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. हा नेमका सगळा प्रकार काय आहे.. आणि एकूणातच एआयच्या जगात काय घडामोडी सुरू आहेत हे सगळं सविस्तर जाणून घेऊया सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून...