

Premium|Artificial Intelligence
sakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर-saptrang@esakal.com
जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विशेषत: ‘जनरेटिव्ह एआय’ (GenAI) आज इतक्या वेगानं वाढतोय, की त्याचा परिणाम आपण रोजच्या आयुष्यात अनुभवतोय. चॅटबॉट्स, इमेज जनरेटर्स, मेडिकल डायग्नोसिस, ऑटोनॉमस व्हेइकल्स - या सगळ्या गोष्टी आता लोकांच्या दैनंदिन वापरात सहजपणे सामावल्या आहेत. पण या सगळ्यामागे जी खरी ताकद आहे, ती म्हणजे जीपीयूजवर चालणारी प्रचंड मोठी डेटा सेंटर्स आणि इथेच एक मोठा, पण शांतपणे वाढणारा जो प्रश्न उभा राहतोय, तो आहे या डेटा सेंटर्सना लागणारी अफाट वीज, पाणी आणि नैसर्गिक संसाधनं. मोठ्या ‘एआय’ मॉडेल्सची शर्यत जितकी वाढतेय, तितकी या सगळ्या संसाधनांची भूकही वाढतेय.