
‘एआय’ मॉडेल्स ट्रेन करण्याकरता हजारो जीपीयू चिप्स, सर्व्हर्स आणि डेटा सेंटर्स लागतात. त्यासाठी मोठी जमीन लागते आणि ती सरकारकडून स्वस्त दरानं करांमध्ये माफी मिळवून ॲमेझॉन, गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट अशा अब्जाधीशांना मिळते. थोडक्यात, सरकार म्हणजेच सामान्य नागरिक ही सबसिडाईज करतात; पण यामधून सामान्य नागरिकांना जेवढा फायदा होतो त्याच्या अनेक पट फायदा हा बिग कॉर्पोरेट्सना होतो. मग आपण ‘एआय’ स्वीकारायचे, ते नक्की कशासाठी...
मस्क म्हणजे एक लहरीच माणूस होता. तो केव्हा, कशामुळे आणि काय करेल याचा काहीच पत्ता नव्हता. क्लायमेट चेंज टाळण्याकरता खरं म्हणजे त्यानं ऑइल कंपन्यांच्या विरुद्ध दंड थोपटायला हवे होते; पण त्याऐवजी त्यानं ‘स्पेस एक्स’ काढून परग्रहावर वस्ती करण्यामध्ये रस दाखवला. एकदा ट्विटरवर चित्रविचित्र मेसेजेस यायला लागले तेव्हा ते बंद करण्याकरता त्यानं चक्क पूर्ण ट्विटरच विकत घेतलं! थोडक्यात, बेभरवशाचा मस्क केव्हा काय करेल हे कोणीच सांगू शकत नव्हतं; अगदी त्याच्यासह!