

Data Center in India
esakal
आज आपण मोबाईलवरून काही सेकंदांत पैसे पाठवतो, गुगलवर माहिती शोधतो, यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो आणि चॅटजीपीटीला प्रश्न विचारतो. पण या प्रत्येक गोष्टीमागे हजारो शक्तिशाली संगणकांची एक मोठी यंत्रणा काम करत असते. तिलाच म्हणतात डेटा सेंटर! विशेष म्हणजे, एआयच्या वाढत्या वापरामुळे या डेटा सेंटर्सची गरज प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीनसारख्या महासत्तांमध्ये संगणकीय शक्तीवर नियंत्रण मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे या डेटा सेंटर संदर्भात सेटर्सला लागणारी वीज, पाणी, कूलिंग व्यवस्था या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याच बरोबर डेटा सेंटर्समुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि पर्यावरण हेही महत्त्वाचे प्रश्न बनले आहेत.
दुसरीकडे, या क्षेत्रात अब्जावधींची गुंतवणूक होत असून भारतही या स्पर्धेत आपलं स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. पण या सगळ्या विस्ताराची खरी किंमत कोणाला मोजावी लागणार? डेटा सेंटरमुळे सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होणार? आणि भविष्यात या क्षेत्रात भारत किती मोठी झेप घेऊ शकतो? या सर्व गोष्टींचा मागोवा घेऊया या लेखातून.