Premium| AI Generated Content: मनोरंजनाच्या नावाखाली मेंदूला गुंगी आणणारा कंटेंट आज सोशल मीडियाचं नवं स्वरूप बनतोय

YouTube Algorithm: ‘एआय माकड’सारखे चॅनेल्स ही केवळ करमणूक नसून ‘एआय स्लॉप’ संस्कृतीचं प्रतीक आहेत. कमी दर्जाचा पण व्यसन लावणारा कंटेंट सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे
AI Generated Content

AI Generated Content

esakal

Updated on

यू-ट्युबवर सर्फिंग करताना तुमच्यासमोर ‘Bandar Apna Dost’ नावाचे चॅनेल आले असेल, तर त्यातील विचित्र हालचाली करणाऱ्या माकडाने तुमचे लक्ष नक्कीच वेधून घेतले असेल. वरकरणी हे एखादे सामान्य ॲनिमेशन वाटत असले, तरी त्यामागचे सत्य आणि त्याची कमाई कोणाचीही झोप उडवणारी आहे.

सध्या भारतातील आणि विशेषतः महानगरांमधील धावपळीच्या जगात, लोकांच्या मोबाईल स्क्रीनवर एक विचित्र बदल घडताना दिसत आहे. आजकाल आपल्या टाइमलाइनवर आणि व्हिडिओ फीडमध्ये जो नवीन ‘हीरो’ धुमाकूळ घालत आहे, तो कोणा चित्रपटाचा अभिनेता नाही किंवा कोणताही खराखुरा माणूसही नाही. हा एक ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ने तयार केलेले खोडकर आणि विचित्र असे ‘माकड’ आहे.

तुम्ही जर यू-ट्युबवर कधी सर्फिंग करीत असाल आणि तुमच्यासमोर ‘Bandar Apna Dost’ नावाचे चॅनेल आले असेल, तर त्यातील विचित्र हालचाली करणाऱ्या माकडाने तुमचे लक्ष नक्कीच वेधून घेतले असेल. वरकरणी हे एखादे सामान्य ॲनिमेशन वाटत असले, तरी त्यामागचे सत्य आणि त्याची कमाई कोणाचीही झोप उडवणारी आहे. एका जागतिक स्तरावरील अभ्यासानुसार, हे चॅनेल सध्या जगातील सर्वाधिक पाहिले जाणारे ‘पूर्णपणे एआय-जनरेटेड’ (Fully AI-generated) चॅनेल ठरले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या डिजिटल माकडाची वार्षिक कमाई तब्बल ४.२५ दशलक्ष डॉलर म्हणजेच भारतीय चलनात जवळपास ३८ कोटी रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com