

india leadership in global ai governance
E sakal
अजेय लेले, सामरिक व्यूहनीतीचे विश्लेषक
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अतिशय महत्त्वाची समजली जाणारी चौथी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स इम्पॅक्ट समिट’ नवी दिल्लीत १९ आणि २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परिषदेत जागतिक हितासाठी ‘एआय’ वापरण्याच्या कल्पनांना भारत चालना देऊ शकतो. अधिक संतुलित आणि जागतिकदृष्ट्या सर्वसमावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासन चौकट तयार करण्यासाठी भारताच्या नेतृत्वविषयक भूमिकेवर परिषदेत भर दिला जाईल.