Premium| AI Threats: एआय - पुढे धोका आहे...

AI Bioweapon Risks: एआयचा योग्य वापर केल्यास संसर्गजन्य रोगांचा अंदाज वर्तवता येतो. नवे उपचार शोधता येतात. परंतु, एआयच्या चुकीच्या वापरामुळे घातक रसायने आणि जैविक शस्त्रनिर्मितीचा धोका वाढतो.
Artificial Intelligence
Artificial Intelligenceesakal
Updated on

संदीप वासलेकर

editor@esakal.com

मार्च २०२३मध्ये ‘चॅट जीपीटी ४’ रिलीज झाले तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चर्चेत आली. पण त्यापूर्वीच ‘एआय’च्या साहाय्याने मानवजातीला गंभीर आरोग्य समस्यांवर उपाय शोधता येतील, अशा अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या होत्या. डॉ. कमरान खान, टोरांटो विद्यापीठाचे प्राध्यापक आणि ब्लू डॉट या कंपनीचे संस्थापक आहेत. ही कंपनी संसर्गजन्य रोगांचा अंदाज वर्तविण्यासाठी ‘एआय’ वापरते.

त्यांनी एक व्यासपीठ विकसित केले आहे. ते व्यासपीठ बातम्यांच्या वेबसाइट्सपासून एअरलाइन बुकिंगपर्यंतच्या स्रोतांपासून ६५ भाषांमध्ये दररोजच्या एक लाख प्रकारच्या माहितीचा मागोवा घेते. डिसेंबर २०१९मध्ये त्यांनी चीनमधील वुहान बाजारात एक नवीन विषाणू शोधला आणि हा विषाणू चीनबाहेर पसरू शकतो, असे इशारा दिला. त्यांनी कॅनडातील त्यांच्या ग्राहकांना वुहानकडे जाणारे मार्ग टाळण्याचा सल्ला दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com