AI-Powered Cyber Attacks
esakal
आज बँक लुटण्यासाठी बँकेत शिरण्याचीही गरज नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने जगभरात घरबसल्या सायबर हल्ले घडवून आणले जात आहेत. डिजिटल व्यवहारांचा विस्तार होत असताना हा धोका खूप गंभीर बनतोय. त्यासंदर्भात जी-७ देशांनी सायबर सुरक्षेसाठी जागतिक स्तरावर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मग एआयचा वापर करून होणारे हल्ले रोखायचे कसे? त्यासंदर्भात जागतिक पातळीवर जी-७ देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांचे प्रमुख यांच्या चर्चेतून कोणती ठोस पाऊले उचलली जाणार आहेत, हे सांगणारा हा लेख.
पूर्वी सायबर हल्ले करण्यासाठी ई-मेल, बनावट संकेतस्थळे किंवा संगणकातील सुरक्षा त्रुटींचा वापर केला जात होता. आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे या फसवणुकीला वेगळं स्वरूप देण्यात येत आहे. हल्लेखोर बनावट आवाज, व्हिडिओ आणि हुबेहुब जवळच्या व्यक्तीचाच वाटावा असा संदेश तयार करू शकतात. त्यामुळे खरा आणि खोटा संदेश यांतील फरक ओळखणे कठीण झाले आहे.
एआयमुळे एकाच वेळी लाखो संदेश तयार करणे आणि प्रत्येक व्यक्तीनुसार त्यात बदल करणेही सोपे झाले आहे. त्यामुळे फसवणुकीचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत केवळ तांत्रिक सुरक्षा पुरेशी ठरत नाही. संशयास्पद मेसेजची स्वतंत्र पडताळणी करणे आणि दिसणाऱ्या किंवा ऐकू येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास न ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.