AI generated video
Esakal
पुणे - एक कुत्र्याचं किंवा माकडाचं तोंड असलेला मुलगा खूप गरीब असतो. तो पैसै मिळवण्यासाठी अत्यंत मेहनत करत असतो. मग खूप कष्ट केल्यानंतर त्याला काही पैसे मिळतात. त्यातून तो त्याच्या बहिणीसाठी केक घेऊन येतो. असे अत्यंत इमोशनल ‘एआय जनरेटेड व्हिडीओ’ तुमची लहान मुलंही पाहतायेत का? पाहत असतील तर सावध रहा. कारण यातला बराचसा कंटेट हा ‘ब्रेनरॉट’ कॅटगरीमधला आहे. असं संशोधनाने समोर आलेलं आहे.
एका व्हिडिओ एडिटिंग कंपनीने जगभरातील १५ हजार यू ट्यूब चॅनेलचा अभ्यास केला असून विविध देशांतील टॉप १०० ट्रेंडिंग यूट्यूब चॅनल्सचे विश्लेषण केले आहे. या अभ्यासातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतात नेमका कोणता कंटेट अधिक पाहिला जातो. यू ट्यूबच्या अल्गोरिदमनुसार कसे व्हिडिओज आपल्याला दिसतात, एआयच्या मदतीने तयार केल्या जाणाऱ्या कंटेटला नेमकं काय म्हटलं जातं, या कंटेटचा यूट्यूबरवर काय परिणाम होतो आहे, तुमची आमची मुलं जो कंटेट अगदी सर्रासपणे पाहतात तो कंटेट नेमका परिणाम करणारा आहे हे सगळं जाणून घेऊया सकाळ+ च्या या विशेष लेखातून.