Work with AI
Esakal
पुणे – जे काम करायला याआधी संपूर्ण दिवस घालवायला लागायचा ते काम आता काही मिनिटांत होतं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळे कामाच्या जगात मोठे बदल होतायेत. काही मिनिटांत अहवाल तयार करणं, गुंतागुंतीच्या आकडेवारीचं विश्लेषण करणं, माहितीचे वर्गीकरण करणं किंवा नव्या विषयावर प्रेझेंटेशन बनवणं अशी अनेक कामं आता AI च्या मदतीनं सहज करता येतात. एखादं काम एखाद्या कर्मचाऱ्याला करायचं असेल तर पूर्वी त्या कामासाठी विशेष प्रशिक्षण घ्यावं लागायचं किंवा टेक्निकल स्किल्सची गरज पडायची, ते कामही तो आता ChatGPT सारख्या साधनांच्या मदतीनं पूर्ण करू शकतो. त्यामुळे कंपन्यांमध्ये AI वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढत असल्याचं चित्र दिसतं आहे.
मात्र या बदलामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न दुर्लक्षित राहतोय तो म्हणजे AI च्या मदतीनं काम पूर्ण करणारा कर्मचारी त्या प्रक्रियेत खरोखर काही शिकतो आहे का? की त्याला केवळ AI च्या मदतीनं काम करून घेता येतं आहे? AI ची सुविधा काढून घेतल्यानंतर तोच कर्मचारी ते काम स्वतंत्रपणे करू शकेल का? या प्रश्नांचा अभ्यास करणारं संशोधन २६ ऑक्टोबर २०२६ रोजी Nature Human Behaviour या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं. जनरेटिव्ह AI मुळं कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता तात्पुरती वाढू शकते; मात्र त्यातून मिळणारं ज्ञान आणि कौशल्य तितक्याच प्रमाणात वाढतंच असं नाही, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे.