Prmeium|Ajanta Cave Fashion : दोन हजार वर्षांपूर्वीच्या भारतीय वेशभूषेचा अजिंठ्यातील अद्भुत कलात्मक वारसा

Ancient Indian Textiles : अजिंठ्याच्या भित्तिचित्रांमधून प्राचीन भारतीय वस्त्रकला, विणकाम आणि वेशभूषेची समृद्ध परंपरा स्पष्ट दिसते. त्या काळातील फॅशन, कलात्मकता आणि उच्च दर्जाच्या कापडनिर्मितीचे हे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज आहेत.
Ajanta Cave Fashion

Ajanta Cave Fashion

esakal

Updated on

शेफाली वैद्य - saptrang@esakal.com

केवळ अंग झाकायचे वस्त्र म्हणजेच केवळ गरज म्हणून भारतात प्राचीन काळीसुद्धा वस्त्राचा वापर होत नसे, एक फॅशन म्हणून म्हणजे वस्त्रांचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी होई. वेशभूषा करताना आज त्याला फॅशन म्हटले जाते पण त्या वेळी त्यात कला तसेच दर्जेदारपणा व कलाकारांच्या विणकामाच्या अद्‍भुत कौशल्याचा संगम असे. वेशभूषा त्यांच्यासाठी अभिव्यक्तीचा एक महत्त्वाचा भाग होती.

गेल्या लेखात आपण अजिंठ्याच्या भित्तिचित्रांमधून दिसणारी विविध प्रकारची वस्त्रे पाहिली. पण वस्त्रकला म्हणजे टेक्सटाईल्स आणि वेशभूषा म्हणजे फॅशन या दोन एकमेकांशी संबंधित, पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वस्त्र म्हणजे कापड, ते विणण्याचे विविध प्रकार, वापरलेले रंग, धागा आणि सुशोभनासाठी वापरलेल्या विविध डिझाइन्स, जसे ब्लॉक प्रिंटिंग, विणकाम आणि भरतकाम. तर फॅशन म्हणजे ते विणलेले कापड शरीरावर कसे ल्यायले जाते, कसे शिवले जाते, कसे नेसले जाते, एकमेकांसोबत कसे जोडून त्याचे कपडे बनवले जातात ह्याचा अभ्यास. अजिंठ्याच्या गुंफांमधील भित्तिचित्रे या दोन्ही गोष्टींचा एकत्रित दस्तऐवज आहेत, म्हणून महत्त्वाची आहेत. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते ही चित्रे साधारण दोन हजार ते पंधराशे वर्षांपूर्वी रंगवली गेली होती. पण आजही ही चित्रे पाहताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे त्या काळातले भारतीय स्त्री-पुरुष कापड केवळ कसेही अंगाभोवती गुंडाळत नव्हते, तर ते फॅशन करत होते, जाणीवपूर्वक आणि कल्पकतेने. मी आतापर्यंत तीन वेळेला अजिंठ्याला जाऊन आलेय आणि प्रत्येक वेळेला तिथली चित्रे आणि त्यातल्या स्त्री-पुरुषांची वेशभूषा पाहून माझ्या मनात एकच विचार येतो, की ह्या चित्रांमध्ये रंगवलेले अनेक कपड्यांचे प्रकार आजही भारतीय फॅशन जगतात प्रचलित आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com