Premium|Ajanta cave textile heritage : अजिंठा भित्तिचित्रांतून उलगडतो भारतीय वस्त्रकलेचा अद्भुत वारसा

Textile Heritage in Ajanta : अजिंठा लेण्यांतील भित्तिचित्रांमधून प्राचीन भारतीय वस्त्रकलेचा समृद्ध वारसा उलगडतो. बांधणी, पासापल्लीसारख्या नक्षी आणि वस्त्रसंस्कृतीचे दृश्य दस्तऐवजीकरण या चित्रांमधून आजही अनुभवता येते.
Ajanta cave textile heritage

Ajanta cave textile heritage

esakal

Updated on

पांढऱ्या पार्श्वभूमीवर लाल-काळ्या चौकड्यांमध्ये रंगवलेले हे वस्त्र आजही पासापल्ली डिझाइन ह्या नावाखाली ओडिशा राज्यातल्या संबलपूर शहराजवळच्या विविंग क्लस्टर मध्ये विणले जाते. बांधणीचेही तसेच. बांधणीचे तंत्र भारतात फार प्राचीन काळापासून कापड सुशोभित करायला वापरले जाते. प्राचीन भारतात ह्या तंत्राला पुलकबंध असे नाव होते.

भारतीय वस्त्रकलेचा समृद्ध इतिहास जर संपूर्णपणे समजून घ्यायचा असेल, तर भारतीय साहित्य, शिल्प आणि चित्रकला ह्या सर्वांचाच सर्वांगीण अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाही. ह्या आधीच्या लेखांमधून आपण उत्तर भारत आणि दक्षिण भारत ह्या भारताच्या दोन्ही भागातल्या मंदिरशिल्पांमधून दिसणारी वस्त्रे पाहिली, तसेच तंजावूरच्या बृहदीश्वर मंदिरातल्या हजार वर्षे जुन्या चोळ-कालीन चित्रांमधील वस्त्रेही पाहिली. पण त्याही आधी कितीतरी शतके महाराष्ट्राच्या गुंफांमधून एक अलौकिक कलाविष्कार जन्म घेत होता, ज्यातून आजही आपल्याला भारताच्या वस्त्रकलेचा एक दृश्य अभिलेख दिसतो. छत्रपती संभाजीनगरपासून शंभरेक किलोमीटरवर असलेल्या अजिंठ्याच्या गुंफांमधील भित्तिचित्रे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहेत. पण ही भित्तिचित्रे केवळ भारतीय चित्रकलेचाच एक अद्वितीय शिखरबिंदू नाहीत, तर ती चित्रे भारताच्या तत्कालीन वस्त्रसंस्कृतीचा एक अत्यंत सुंदर आणि रसरशीत पट आपल्यापुढे साकारतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com