
शरत् प्रधान
राजकीय अस्तित्वासाठी धडपडत असलेल्या उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचा राष्ट्रीय समन्वयकपदी मायावती यांनी पुन्हा एकदा आकाश आनंद या कुटुंबातील व्यक्तीलाच पुढे आणले आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर पक्षाच्या ध्येयधोरणांमध्ये काय बदल होतात, ते पाहावे लागणार आहे.
मायावतींच्या बहुजन समाज पक्षात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आपल्याच घराण्यातील एका व्यक्तीला आपला वारसदार करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी आपल्या भावाचा मुलगा आकाश आनंद यांना पुन्हा पक्षात आणून दुसऱ्या क्रमांकाचे स्थान दिले आहे.