
सुनील चावके
दिल्लीच्या स्वार्थी आणि संधीसाधू विश्वात मराठीजनांनी बुद्धिमत्तेला कार्यक्षमतेची आणि प्रामाणिकतेची जोड देत वर्षानुवर्षे आपली विश्वासार्हता जपली. आर्थिक उदारीकरणाच्या पर्वानंतर दिल्लीत महाराष्ट्राचे वजन वाढले. पण गुणवत्तेचा ‘राजकीय लाभांश’ पदरी पाडून घेण्यात महाराष्ट्र मागे राहिला. हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.