

Samajwadi Party PDA formulac
esakal
समाजवादी पक्षाच्या ओबीसी, दलित आणि अल्पसंख्याक (पीडीए) या मतपेढीला धक्का देण्यासाठी भाजपने सुरू केलेले प्रयत्न पाहून अखिलेश यादव अस्वस्थ झाले आहेत. दिवसातील २४ तास आणि आठवड्याचे सर्व दिवस सुरू असलेली ‘निवडणूक यंत्रणा’ म्हणून ओळखले जाणारे मोदी-शहा अखिलेश यांच्या ‘पीडीए’ला कमकुवत करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करीत आहेत. उत्तर प्रदेशमधील या राजकीय घडामोडींबद्दल...
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पिछडा (ओबीसी)-दलित-अल्पसंख्याक (पीडीए) या मतपेढीला धक्का देण्याबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे चिंतेत असल्याचे दिसते. ही मतपेढी आपल्याकडे राहावी यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे दिसते आहे.