
अलका कुबल
saptrang@esakal.com
आतापर्यंत मी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे; परंतु ‘माहेरची साडी’, ‘धुरळा’ आणि ‘नवसाचं पोर’ या चित्रपटांनी मला वेगळी ओळख दिली. ‘माहेरची साडी’ या चित्रपटामुळे मला ग्लॅमर, प्रसिद्धी मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर माझ्या नावाची चर्चा झाली; पण मी त्याकडे वेगळी भूमिका म्हणून पाहत नाही. ‘माहेरची साडी’, ‘नवसाचं पोर’ अशा चित्रपटांनी मला एक अभिनेत्री म्हणून घडवलं. त्या काळात मी तब्बल पंधरा वर्षे टॉपची अभिनेत्री होते आणि दरवर्षी दहा-दहा चित्रपट करीत होते. त्यामुळे या भूमिकांचं माझ्या कारकीर्दीत विशेष महत्त्व आहे.