
राजेश कळंबटे
कोकणच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर इथे पर्यटनाबरोबरच आंबा, काजू आणि मासळी ही नैसर्गिक उत्पादने महत्त्वाची भूमिका बजावतात. आंबा हे या प्रदेशातले नगदी पीक मानले जाते. त्यातही आंब्याच्या विविध स्थानिक जातींपेक्षा हापूस आंब्याचे वेगळेच माहात्म्य आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारा हापूस जगप्रसिद्ध आहे.
उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला, की हापूसची चव कधी चाखायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना असते; परंतु २००९च्या फयान चक्रीवादळानंतर हवामानासह इतर बदललेल्या घटकांचा विचार केला, तर हापूस आंब्याची बाग उत्पन्नाच्या दृष्टीने नुकसानकारक ठरत आहे. त्यामुळे निसर्गचक्रात अडकलेल्या हापूस आंब्याचे अर्थकारण टिकवण्याचे आव्हान आजही कायम आहे....!