Premium| Ambajogai Temples: प्राचीन मंदिरं, भव्य लेणी आणि सांस्कृतिक वारसा असणाऱ्या अंबाजोगाई शहराचा हा इतिहास तुम्हाला माहित आहे का?
ओंकार वर्तले,
ovartale@gmail.com
संस्कृती, इतिहास व कलेचं ‘माहेरघर’ म्हणून मराठवाडा ओळखला जातो. लेणी, मूर्ती व मंदिरे यासंदर्भात अन्य प्रांतांपेक्षा सर्वाधिक समृद्ध असणाऱ्या मराठवाड्याचे भारतीय कलेच्या प्रांगणात खूपच महत्त्वाचे योगदान असून, त्यामुळेच मराठवाड्याला ‘मंदिरांचा वाडा’ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, इतके या प्रांतात कलेचे दान पडले आहे. हे दान वेचण्यासाठी आपली पावले न वळली तरच नवल.
अंबाजोगाई हे बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण. याचे प्राचीन संदर्भही अनेक कागदपत्रांत आढळतात. त्यात या शहराला प्राचीन काळी अंबानगरी व जयवंतीनगर म्हणूनही ओळखले जात होते. अनेक अभ्यासकांचे असे मत आहे, की मराठी भाषेचा उगम याच अंबाजोगाईमध्ये झाला. मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज यांनी त्यांच्या काही ग्रंथांची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला हे सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे शहर बाराव्या शतकात यादवांच्या शासन काळातही मोठे सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. येथील जोगेश्वरी देवीचे मंदिर तर प्रसिद्ध आहेच; पण याशिवाय इथे असलेली अनेक मंदिरे, लेणी पर्यटकांना समृद्ध करून सोडतात.