
अमेरिकेच्या संरक्षणसज्जतेतील त्रुटी हेरून चीन आणि रशिया हे एकत्रितरीत्या क्षेपणास्त्रप्रणाली विकसित करत असल्याची भीती अमेरिकेला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी क्षेपणास्त्ररोधक ‘आयर्न डोम’ अमेरिकेसाठी निर्माण करण्याचा निर्णय जाहीर केला. या संकल्पनेचा नेमका अर्थ आणि व्याप्ती याविषयी.
डॅनियल गोल्ड हे इस्राईलच्या संरक्षण संशोधन आणि विकास संचालनालयाचे ( डीडीआर अँड डी) २००३ ते २०१० या कालावधीत प्रमुख असताना इस्राईलने ‘आयर्न डोम’ या हवाई संरक्षणप्रणालीची निर्मिती केली. या ‘आयर्न डोम’च्या निर्मितीमध्ये, अभियंता आणि लष्करी अधिकारी असणाऱ्या गोल्ड यांचा सिंहाचा वाटा असल्याचे आणि त्यांनीच ‘आयर्न डोम’ हे नाव सुचविल्याचे मानले जाते.