
कृष्णा लोखंडे, अमरावती
आधी केलेला खर्च त्यामुळे वाया जाऊन दुबार पेरणीची वेळ येते व तेवढी शक्ती अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये राहत नाही. या शेतकऱ्यांना मग कर्ज घेण्याची वेळ येते व ते या दुष्टचक्रात अडकत जातात. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे हे कारण आहे. एप्रिल व मे महिन्यात अमरावती जिल्ह्यात ४५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
यंदा मे महिन्यात अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत एक हजार टक्के अधिक झालेल्या पावसानंतर जून महिन्यात प्रारंभी थोडा पाऊस झाला, नंतर मात्र त्याने दडी मारल्याने पेरण्या धरता आलेल्या नाहीत. जूनमध्ये १९ तारखेपर्यंत विभागात ५३.४ टक्के पाऊस झाला आहे. जमिनीत अद्याप पेरणीयोग्य ओल नसल्याने वाफाऱ्याने बियाणे जळून जाण्याचीच शक्यता अधिक आहे.