
सुजाता आ. लेले
Cu Chi टनेल्समध्ये इतक्या लहान आकाराचे, कमी उंचीचे भुयारी मार्ग काढले आहेत, की आम्ही नुसते वाकून जातानासुद्धा घामाघूम होत होतो. जमिनीवर एक गवताळ फरशीसारखा तुकडा होता, तो बाजूला केला तर एक अंगाने बारीक पण किंचित उंच सैनिक उभा राहू शकेल इतका खोल खड्डा होता! शत्रुला हुलकावण्या देण्यासाठीच्या या साऱ्या कल्पना पाहून थक्क व्हायला होते.
आधी चारजण, मग सहाजण असे करत करत आणखीन दोन जोडपी आमच्यात सामील होऊन आठजण व्हिएतनामला जायचा प्लॅन केला. प्रवास सुरू झाला व्हिएतनामची राजधानी हनोईपासून. म्युझियममध्ये रूपांतरित झालेले होआ लो प्रिझन बघितले. तिथल्या बंदीवानांचे पुतळे बघितल्यावर खूप वाईट वाटले. नंतर होअन क्लेन लेक बघितला. या लेकच्या भोवती फ्रेंच वसाहती आहेत. स्वच्छता होतीच, कर्कश्श आवाज नव्हते.