
मी आजवर रंगमंच, चित्रपट आणि मालिकांतून खूप काम केलंय. अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आलो; पण काही भूमिका, काही नाट्यप्रयोग असे असतात जे केवळ ‘काम’ राहात नाहीत तर ते तुमचं विचारविश्व, संवेदना आणि माणूस म्हणून तुमचं जगणं बदलून टाकतात. ‘माणसा माणसा हूप हूप’ हे नाटक तसंच होतं. ते अशोक पाटोळे यांनी लिहिलं होतं आणि कुमार सोहोनी यांनी दिग्दर्शित केलं होतं. त्यात मी चिंपांझीची भूमिका साकारली होती. ही भूमिका मला आवडलेली भूमिका.