Premium|AI security risk : ॲन्थ्रॉपिकच्या 'मायथॉस' तंत्रज्ञानाने जग हादरले; सॉफ्टवेअर सुरक्षेसमोर उभे केले आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान!

Anthropic Mythos AI Technology : ॲन्थ्रॉपिक कंपनीच्या 'मायथॉस' या नव्या तंत्रज्ञानाने सॉफ्टवेअर सुरक्षेसमोर निर्माण केलेले मोठे आव्हान आणि गुगलने प्रतिस्पर्धी कंपनीतच कोट्यवधींची गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय यांमुळे एआय विश्वात झालेली अभूतपूर्व आणि ऐतिहासिक खळबळ.
Anthropic Mythos AI Technology

Anthropic Mythos AI Technology

esakal

Updated on

अतुल कहाते - akahate@gmail.com

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’च्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीत आता एक नवे वळण आले आहे. ॲन्थ्रॉपिक या कंपनीने विकसित केलेल्या ‘मायथॉस’ या तंत्रज्ञानामुळे जगभरातील सॉफ्टवेअर सुरक्षेला अभूतपूर्व आव्हान निर्माण झाले आहे. सॉफ्टवेअरमधील खोलवर दडलेल्या त्रुटी शोधून काढण्याची क्षमता असलेले हे साधन तंत्रज्ञानविश्वासाठी जितके उपयुक्त, तितकेच संभाव्यतः धोकादायक ठरू शकते.

डारिओ अमोडाई हे ॲ‍न्थ्रॉपिक या सध्या जगभरात गाजत असलेल्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ‘एआय’च्या विश्वात ॲ‍न्थ्रॉपिक कंपनीने सध्या नुसता धुमाकूळ घातला आहे. या कंपनीच्या वतीने केल्या जात असलेल्या घोषणा ऐकून आपण अवाक होईपर्यंत नव्याने धक्का द्यायला ती तयारच असते. या कंपनीच्या प्रगतीची आणि एकूणच ‘एआय’मध्ये तिने घेतलेल्या झेपेची कल्पना आपल्याला अलीकडच्या एका घटनेतून येईल. ‘एआय’च्याच क्षेत्रात अतिशय मूलभूत कामगिरी करत असलेल्या ॲ‍न्थ्रॉपिकच्या कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या गुगल (अल्फाबेट) कंपनीने आता ॲ‍न्थ्रॉपिकमध्येच आर्थिक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com