
डॉ. दीप्ती सिधये
विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संस्कृती यासारख्या विविध क्षेत्रांत प्रकाश-विज्ञान, प्रकाशाधारित तंत्रज्ञान यांबद्दल जागरुकता निर्माण करणे, या हेतूने ‘आंतरराष्ट्रीय प्रकाश दिना’चे आयोजन केले जाते. नुकत्याच पार पडलेल्या या दिनानिमित्त प्रकाश तंत्रज्ञान आणि प्रकाशाचे गुणधर्म याविषयी.
भौतिकशास्त्रज्ञ थिओडोर मैमन यांनी ह्यूजेस प्रयोगशाळेत रुबी रॉडचा वापर करून लाल रंगाचा प्रकाश उत्सर्जित करणारा एक लेसर तयार केला. ‘युनेस्को’ने या अभूतपूर्व शोधाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी या कार्यान्वित होणाऱ्या पहिल्या लेसरच्या निर्मितीचा दिवस ‘आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन’ म्हणून घोषित जाहीर केला. नुकत्याच (सोळा मे) साजऱ्या झालेल्या या दिवसाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश तंत्रज्ञानाविषयी आणि त्यासाठी आधारभूत असलेल्या प्रकाशाच्या काही गुणधर्मांविषयी जाणून घेऊया.