

Artificial General Intelligence
esakal
गेल्या काही वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात झालेली प्रगती अक्षरशः थक्क करणारी आहे. काही वर्षांपूर्वी संगणकाला माणसासारखे लिहिता येणे, चित्र समजणे किंवा कोड तयार करणे म्हणजे आश्चर्याची गोष्ट होती. मात्र, आजची अत्याधुनिक एआय मॉडेल्स त्यापेक्षाही कितीतरी पुढे गेली आहेत. ती केवळ प्रश्नांची उत्तरे देत नाहीत, तर कोड लिहितात, संशोधनात मदत करतात, संगणकावर विविध कामे करतात आणि काही बाबतींत अनेक टप्प्यांची कामे स्वतःहून पूर्ण करण्याचाही प्रयत्न करतात. या वेगवान प्रगतीच्या पार्श्वभूमीवर आता ‘एजीआय’ (AGI) हा शब्द पुन्हा चर्चेत आला आहे. एजीआय म्हणजे Artificial General Intelligence अर्थात ‘कृत्रिम सामान्य बुद्धिमत्ता’. विशेष म्हणजे, एआयच्या क्षेत्रातील आघाडीच्या अँथ्रॉपिक, ओपनएआय आणि गुगल डीपमाइंडसारख्या कंपन्यांकडूनच अत्यंत प्रगत एआयच्या संभाव्य धोक्यांबाबत इशारे दिले जात आहेत. ...पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. एजीआय खरेच इतकी जवळ आली आहे का? की तिच्या आगमनाविषयीची भाषा ही तंत्रज्ञानाच्या शर्यतीचा, राजकारणाचा आणि अब्जावधी डॉलरच्या व्यावसायिक हितसंबंधांचा भाग आहे?