
महाॲग्री - एआय धोरण हा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अन्य उदयोन्मुख तंत्रज्ञानांची कृषी क्षेत्राशी जोड देऊन महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी तयार केलेला महत्त्वाकांक्षी व दिशादर्शक आराखडा आहे. कमी उत्पादन क्षमता, हवामान बदल, पाण्याचा ताण अशा सतत भेडसावणाऱ्या आव्हानांवर मात करून उत्पादकता वाढ, लवचिकता (Resilience) आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून शाश्वत विकास साध्य करणे हे या धोरणाचे लक्ष्य आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही काही जादूची कांडी नाही; पण ते एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे. याचा योग्य वापर केला तर शेतीत नक्कीच नवं पर्व सुरू होईल. उत्पादन वाढेल, खर्च कमी होईल, मालाला चांगला भाव मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बळीराजाचं जीवन सुकर होईल.