
लेखक : ऋषिराज तायडे
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आल्याने आता नोकऱ्या जाणार असे समज गैरसमज लोकांमध्ये पसरलेले असताना दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रात सरकारकडून केले जाणारे प्रयत्न हे देशपातळीवरील मोठ्या समस्या सोडविण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. कोणत्या क्षेत्रात सध्या सरकारकडून काय प्रयोग केले जात आहेत हे समजून घेऊया.