Premium|Longevity & AI revolution : एआय, प्रोटीन फोल्डिंग आणि जीन एडिटिंगच्या क्रांतीतून १५० वर्षांच्या निरोगी आयुष्याचा महामार्ग

AI Longevity Revolution : प्रोटीन फोल्डिंग आणि 'एआय'च्या संगमामुळे मानवी वृद्धत्वाचे कोडे सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वैज्ञानिक क्रांतीमुळे आता माणूस १२० ते १५० वर्षांपर्यंत निरोगी जगू शकेल, असा विश्वास ज्येष्ठ तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
Longevity & AI revolution

Longevity & AI revolution

esakal

Updated on

अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर

प्रोटीनचं फोल्डिंग म्हणजे एखाद्या गुप्त कोडचा अचूक पासवर्ड जुळवण्यासारखं आहे. जर ते चुकीच्या पद्धतीनं फोल्ड झालं, तर पासवर्ड चुकतो आणि पेशींचं काम तिथंच थांबतं. अल्झायमर किंवा पार्किन्सन्स यांच्यासारखे अनेक गंभीर आजार याच चुकीच्या फोल्डिंगमुळे होत असतात. ज्या दिवशी आपल्याला प्रोटीनचं हे वागणं आणि फोल्डिंग पक्कं समजेल, त्या दिवशी शरीराचं ''एजिंग'' घड्याळ खरं तर उलटं फिरायला लागेल, असा मोठा विश्वास आता निर्माण झाला आहे.

दीर्घायुष्याची कहाणी आजवरच्या इतिहासापेक्षा खूप वेगळी आहे. ती फक्त शतकांपूर्वीच्या साध्या राहणीमानात नाही, तर थेट आपल्या पेशींच्या आत दडलेली आहे. वय वाढण्यामागची कारणं आपण समजून घेतली खरी; पण आता खरा प्रश्न असा आहे, की वैज्ञानिक नेमकं काय करताहेत, ज्यामुळे माणूस १०० नव्हे, तर १२० ते १५० वर्षं निरोगी जगू शकेल? हे काम काही केवळ ‘फॅन्टसी’ नाही, तर जगभरातील प्रयोगशाळांमध्ये सुरू झालेली एक जबरदस्त क्रांती आहे. पीटर डायमंडिस, डेव्हिड सिंकलेर, पीटर एटीया हे तज्ज्ञ फक्त वैज्ञानिक नाहीत, तर दीर्घायुष्याच्या या नवीन पर्वाचे शिल्पकार आहेत. एक डॉक्टर, एक जेनेटिक्स तज्ज्ञ आणि एक उद्योजक या सर्वांचा ध्यास एकच आहे, तो म्हणजे मृत्यू नव्हे, तर वृद्धत्व कसं टाळता येईल? आणि हे शक्य करण्यासाठी विज्ञानाच्या या शर्यतीला आता ‘टर्बो इंजिन’ लावलं आहे ते कृत्रिम बुद्धिमत्तेनं म्हणजेच ‘एआय’नं!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com