Premium|Artificial Narrow Intelligence (ANI) : सकाळपासून रात्रीपर्यंत: एआयच्या सहवासातील आपला प्रवास

Artificial Intelligence Evolution : लेखक अच्युत गोडबोले आणि रोहित पांढारकर यांनी 'एएनआय' या संकुचित कृत्रिम बुद्धिमत्तेचा रंजक प्रवास मांडला आहे. मानवी जीवनात अदृश्यपणे शिरकाव केलेल्या या तंत्रज्ञानाचे उगम, मर्यादा आणि भविष्यातील एजीआयमधील बदलांचे सविस्तर विश्लेषण त्यांनी केले आहे.
Artificial Narrow Intelligence (ANI)

Artificial Narrow Intelligence (ANI)

esakal

Updated on

अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर

आपण रोजच्या आयुष्यात किती वेळा एएनआय वापरतो, याची आपण साधी कल्पनाही करू शकत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण या अदृश्य बुद्धिमत्तेच्या गराड्यात असतो. सिरी, अलेक्सा किंवा गुगल असिस्टंट तुमच्या आवाजातल्या सूचना समजून घेतात आणि त्याप्रमाणे कृती करतात. आपण कोणते कपडे खरेदी करायचे, कोणती बातमी वाचायची किंवा कोणता सिनेमा पाहायचा, या आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीवरही एएनआयचा मोठा प्रभाव पडतोय.

आपण एका अतिशय विलक्षण काळातून जात आहोत, जिथं तंत्रज्ञान केवळ आपल्या सोयीसाठी नाही तर आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. काही दशकांपूर्वी संगणक म्हणजे केवळ आकडेमोड करणारी जड यंत्रं अशी आपली साधी समजूत होती. पण आज हीच यंत्रं आपल्याशी चक्क संवाद साधतात, आपल्याला अनोळखी रस्ते दाखवतात, आपले फोटो ओळखतात आणि गंभीर आजारांचं निदान करायलाही मदत करतात. अनेक क्षेत्रांत तर ही यंत्रं आता मानवापेक्षाही अचूक आणि वेगवान निर्णय घेत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा शब्द आता केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित राहिलेला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com