

Ravinder Reddy Sculptures
esakal
‘काका किशाचा’ गाजलं. प्रेक्षकांनी, समीक्षकांनी गौरवलं. आजही जुनी मंडळी त्यातल्या माझ्या चालण्याच्या लकबीची आठवण करून देतात. अर्थात हे सगळं मिलिंद रसाळमुळेच. त्याने मला भूमिकेत व्यवस्थित बांधलं होतं, कोरलं होतं, रंगवलं होतं. त्यानंतर यशराज जाधव या माणसामुळे मला ‘एनएसडी’ने खुणावलं...
‘विमणस्क नाही रे विमनस्क...’ मिलिंद रसाळ नावाच्या माझ्या दिग्दर्शकाने मी अकरावीत असताना व्याकरणामध्ये ही दुरुस्ती सुचवली. इतकं खजील व्हायला झालं आणि समजलं, की आपल्याला अजून बरंच शिकायला पाहिजे! आपल्याला वाटतं आपण अभिनय करतोय, पण ज्या भाषेत करतोय ती भाषाही आपल्याला नीट बोलता येऊ नये!