

Emotional Musical Memories
esakal
हृदयनाथ मंगेशकर
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर
यांनी त्यांच्याबाबतच्या आठवणींचा पट यापूर्वी उलगडला होता. या
लेखमालेचे काही भाग प्रसिद्ध झाले. आशाताईंबरोबरच्या वेगळ्याच आठवणी आजच्या भागात...
‘‘होय, आशाबाई, आरती आणि बाळ यांना
आम्ही साहित्यिक, ‘जीनियस’ म्हणतो.’’
आशाताई किंचित खिान्न स्वरात म्हणाली.
‘‘शांताबाई ! तुम्ही मोठ्या लेखिका. मला एक सांगा.
हे गाणं ऐकताना, हे गाणं गात असताना
मला उदास का वाटत होते?
‘टाकुनिया घरदार नाचणार नाचणार
नको नको म्हणताना मनमोर भरराना’
अशी आनंदी ओळ गात असताना,
पावसासारख्या आनंदी ऋतूला बोलावताना
उदास का वाटते?
‘फुले माझी अळुमाळु वारा बघे चुरगळु
नको नको म्हणताना गंध गेला राना वना’
हे कवी का लिहितो?
ही फुलं कोण चुरगळतंय?
हे नको नको कोण आणि का म्हणतंय?
हे सारे प्रश्न मला गाताना सतावत होते.
तुम्ही काही सांगू शकाल याबद्दल?’’
शांताबाई मिश्कीलपणे हसल्या. म्हणाल्या.
‘‘आशाबाई ! ज्यांनी ही कविता निवडली,
ज्यांनी ती समजून, स्वरबद्ध केली, ते बाळ
यांनाच ते विचारा ना.’’