
प्रा. शहाजी मोरे
आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाहून परतल्यानंतर नुकतीच ३१ मार्च रोजी सुनीता विल्यम्स व सहअंतराळवीर बुच विल्मोर यांनी आपले अनुभवकथन केले. या पत्रकार परिषदेत सुनीता विल्यम्स यांनी अवकाशातून भारत अतिशय मनोहारी दिसतो, असे सांगितले. या निमित्ताने अंतराळातील जगणे नेमके कसे असते, हे जाणून घ्यायला हवे. त्यातून या दोघांच्या पराक्रमाची कल्पना येईल.
आपल्याला आठ दिवसांऐवजी तब्बल २८६ दिवस अंतराळात रहावयास लागेल, याची सुतराम कल्पना नसलेले सुनीता विल्यम्स व बुच वूल्मर हे पृथ्वीवर सुखरूप पोहोचले असले तरी त्यांना पृथ्वीवर परतल्यापासून पंचेचाळीस दिवस घरी जाता येत नाही. अवकाशातून पृथ्वीवर परतलेल्या अवकाशवीरांच्या आरोग्य पुनवर्सन केंद्रात रहावे लागते.