AI Self Driving Cars: एआयवर आधारीत तंत्रज्ञानामुळे लवकरच ड्रायवरची गरज संपणार, आता तुमची गाडी एआय चालवणार

Computer Vision in Vehicles: स्वयंचलित गाड्या म्हणजे एआय, कॉम्प्युटर व्हिजन, रडार अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम, या तंत्रज्ञानामुळे वाहनांना निर्णय घेता येतात, अपघात कमी होतात आणि सुरक्षित प्रवास शक्य होतो
Computer Vision in Vehicles
Computer Vision in Vehiclesesakal
Updated on

ब्रिजेश सिंह

Brijeshbsingh@gmail.com

कॉम्प्युटर व्हिजन, सेन्सर फ्युजन, मशीन लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानामुळे गाड्या परिसर ओळखू शकतात, निर्णय घेऊ शकतात आणि स्वतःला नियंत्रित करू शकतात. एआय तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीमुळे भविष्यातील गाड्या अधिक हुशार, सुरक्षित आणि कार्यक्षम बनतील, ज्यामुळे आपल्या प्रवासाच्या पद्धतीत मोठी क्रांती घडून येईल. अपघात कमी करणे आणि वाहतूक कोंडीतून सुटका करणे, यांसारखे मोठे फायदे यामुळे भविष्यात मिळू शकतात.

माझ्या अलीकडच्या अमेरिका भेटीदरम्यान मित्राने मला त्याच्या पूर्णपणे स्वयंचलित टेस्ला कारमध्ये फिरवले. आम्ही एका दिवसात ३०० मैलांचा प्रवास केला. कारने स्वतःच वाहन चालवले, मित्राच्या हस्तक्षेपाशिवाय. ती सिग्नलवर थांबली, पादचाऱ्यांना मार्ग दिला आणि आमच्या मार्गावर, गंतव्यस्थानावर आणि बॅटरीतील सध्याच्या चार्जवर आधारित सर्वात जवळच्या चार्जिंग स्टेशनपर्यंतचे अंतरही मोजले...

हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता. भविष्यातील वाहतूक तंत्रज्ञान प्रत्यक्षात पाहून मला खूप आश्चर्य वाटले. कार इतकी हुशार होती, की ती वाहतुकीच्या सर्व परिस्थितींना सहजपणे सामोरे जात होती.आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर धावणाऱ्या स्वयंचलित किंवा चालकविरहित गाड्या हे भविष्य आता वास्तवाच्या उंबरठ्यावर आहे. या गाड्या एआय तंत्रज्ञानाचा एक उत्कृष्ट नमुना आहेत, ज्या रस्त्यावरील डेटा गोळा करून, त्याचे विश्लेषण करून अचूक निर्णय घेण्यास सक्षम आहेत. चला तर मग, या गाड्यांमध्ये एआय तंत्रज्ञान नेमके कसे काम करते आणि जगभरात कोणत्या कंपन्या व शहरे यात आघाडीवर आहेत, याचा सविस्तर आढावा घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com